महिलांना नको ते औषध द्यायचा नंतर….;अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा

---Advertisement---

 

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करताना त्यांना नको ते औषध द्यायचा. त्यानंतर महिला संबंध ठेवण्यासाठी तयार व्हायच्या असे म्हटले जात आहे. याबाबत विशिष्ट औषधे दिल्याचा संशय विशेष तपास पथकाच्या (SIT) तपासात व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील काही नामांकित डॉक्टरांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

तपास यंत्रणांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित औषधे मिळवण्यासाठी खरातला काही वैद्यकीय व्यक्तींची मदत मिळत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या डॉक्टरांना लवकरच चौकशीसाठी समन्स बजावले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या घडामोडींमुळे वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

यापूर्वी भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांचे शोषण केल्याचे आरोप खरातवर झाले आहेत. मात्र, आता तपासात पीडित महिलांना गर्भधारणा टाळण्यासाठी किंवा त्यांची शुद्ध हरपण्यासाठी औषधांचा वापर करण्यात आला का, याबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहे. काही महिलांनी दिलेल्या जबाबानुसार, खरातच्या केबिनमध्ये गेल्यानंतरघडलेल्या घटनांची स्पष्ट आठवण राहत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या गंभीर प्रकरणाचा तपास वेगाने सुरु असून SIT पथकाने तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे. खरातच्या संपकति असलेल्या डॉक्टरांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या क्लिनिक आणि मेडिकल स्टोअर्समधील औषध खरेदी-विक्रीचे व्यवहार तपासले जाणार आहेत. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---