यावल शहरात पोलिसांच्यावतीने ऑपरेशन वाॅश आऊट; पन्नीची दारू, सट्टा जुगार वर छापे, चार जण ताब्यात…!

---Advertisement---

 

पोलिसांच्या वतीने यावल शहरात ऑपरेशन वाॅश आऊट राबवण्यात आले. यात बस स्थानकाच्या आवारात अवैद्य रित्या विक्री केली जाणारी पन्नीची दारू जप्त करण्यात आली तसेच सट्टा, जुगारवर देखील छापा टाकण्यात आला या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे अवैद्य धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

यावल पोलिसांच्या वतीने ऑपरेशन वॉश आऊट हाती घेण्यात आले. सोमवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, सहायक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार राजेंद्र पवार, अमित तडवी सह पथकाने बस स्थानका समोर असलेल्या एका हॉटेलच्या आड दोघे गावठी पन्नीची दारू विक्री करीत असल्याची पोलिसांना गोपनिय माहिती मिळाली होती. तेव्हा तेथे पोलिसांनी छापा टाकून तब्बल १२० लिटर १२ हजार रुपये किमतीची गावठी पन्नीची दारू जप्त केली सदर दारू ही चक्क एका फ्रिजमध्ये ठेवली होती. थंडपेयच्या आड हा व्यवसाय सुरू होता. तर या प्रकरणी आकाश कोळी व विजय माळी या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांविरूध्द मुंबई दारू बंदी सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे. तर या कारवाईमुळे शहरात अवैद्य धंदे करणाऱ्यांचे चांगलेचं धाबे दणाणले होते. 

यावल शहरातील बाबूजीपुरा भागात सट्टा जुगार खेळवत असताना सय्यद नियाज अली याला पोलिसांनी पकडले त्याच्याकडून रोख रक्कम तसेच सट्टा जुगार चे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार मोहन तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील सुंदर नगरी भागात देखील जयेश बारी हा बोरावल गेट जवळील टपरीचे आडोशाला सट्टा जुगार खेळत होता. त्याच्याकडून देखील सट्टा जुगार चे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली दोन्ही कडून १ हजार २६० रूपये रोेख व साहित्य जप्त केले. दुसऱ्या कारवाईत अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार विजय पासपोळे, पोलीस हवालदार अमित तडवी करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---